सुधारित मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी विधेयक 2020 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सुधारित मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी विधेयक 2020 ला आज केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूरी दिली. हे विधेयक येत्या संसदेच्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.
जावडेकर म्हणाले, सुधारित मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी विधेयक संसदेत मांडण्यात येणार असून, महिलांना यापूर्वी गर्भपातासाठी असलेली 20 महिन्यांची मर्यादा 24 आठवडय़ापर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील माता मृत्यूदर कमी होणार आहे. गर्भपातासाठी 24 आठवडय़ांपर्यंत मुदत वाढवण्यात आल्यास बलात्कार पीडित महिला आणि अल्पवयीन मुलींना दिलासा मिळणार आहे. यापूर्वी 20 आठवडय़ात गर्भपात केल्यानंतर आईच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता त्याला आळा बसणार आहे.