राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘भोंगा’ या चित्रपटाने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच आपले नाव प्रत्येक सिनेप्रेमींच्या हृदयावर कोरले. ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एका वेगळ्या अनुषंगाने वा कथेच्या जोरावर हा ‘भोंगा’ चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. सततच्या आवाजाने लहान मुले, आजारी माणसे म्हणा वा वयोवृद्धांना त्रास होतोच मात्र त्यावर तोडगा हा काहीच निघत नाही. आपलं ते खरं करण्याची मानवीवृत्ती अशा या समस्यांना दुजोराच देते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ‘भोंगा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढून राहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती निर्माते, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली असून या आशयघन चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीयपुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी पेलवली. तर ‘अमोल कागणे फिल्म्स’ प्रस्तुत हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची कथा आणि संवाद शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे लिखित आहेत. तर चित्रपटातील गाणी विजय गटलेवार यांची असून गाण्याचे बोल सुबोध पवार लिखित आहेत.
Previous Articleकाणकोणात साडेतीन इंच पावसाची नोंद
Next Article कुडचडे परिसराला पावसाने झोडपले
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.