महालया उत्सवासाठी जाणाऱया भाविकांवर काळाचा घाला
वृत्तसंस्था / ढाका
बांगलादेशात रविवारी भाविकांनी भरलेली एक नौका बुडाली आहे. पंचगढ जिल्हय़ात कोरोटोआ नदीत झालेल्या या दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला तर 30 जण बेपत्ता झाले आहेत. दुर्गापूजेच्या एक दिवस अगोदर महालय उत्सव साजरा करण्यासाठी या नौकेतून भाविक प्रसिद्ध बिदेशरी मंदिराकडे जात होते. बचाव पथक बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची भीती अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.
आतापर्यंत 60 लोकांना वाचविण्यात आले आहे. तर 10 हून अधिक जखमींना उपचारासाठी बोडा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पंचगढ जिल्हय़ाचे उपायुक्त मोहम्मद जुहुरुल इस्लाम यांनी दिली आहे.