वृत्तसंस्था / नवी दिल्ली
83 वर्षीय उद्योजकाने 23,922 कोटी रुपयांचे मूल्य असणारी कंपनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. पॅटागोनिया कंपनीचे संस्थापक व्योन चोइनार्ड यांनी ही चकित करणारी घोषणा केली आहे. आता केवळ पृथ्वीच माझ्या कंपनीची एकमात्र हिस्सेदार असल्याचे चोइनार्ड यांनी म्हटले आहे. कंपनीला होणारा लाभ आता पर्यावरणाशी निगडित मुद्दे आणि हवामान संकटावर खर्च केला जाणार आहे. पर्यावरण रक्षण अन् हवामान संकट रोखण्यासाठी चोइनार्ड आणि त्यांच्या कुटुंबाने कंपनी दान करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
पॅटागोनिया अमेरिकेतील प्रख्यात आउटडोअर क्लोथिंग कंपनी आहे. कंपनी यापुढे देखील कपडे, कॅम्पिंगशी निगडित गोष्टी आणि अन्य सामग्रीची निर्मिती करणार आहे. परंतु या उत्पादनांपासून प्राप्त होणाऱया नफ्याची रक्कम हवामान बदल संकट रोखण्यासाठी वापरली जाणार आहे. गोइनार्ड हे गिर्यारोहक राहिले आहेत. सुमारे 50 वर्षांपूर्वी त्यांनी पॅटागोनिया कंपनी कॅलिफोर्नियात स्थापन केली होती. तेव्हापासून या कंपनीचे मूल्य हजारो कोटींमध्ये पोहाचले आहे.