वार्ताहर / दाभोळ
दापोली तालुक्यातील दाभोळ बंदरामध्ये शुक्रवारी सायंकाळी 5 च्या दरम्यान सोन्याची जेजुरी ही बोट डिझेल तस्करी प्रकरणी कस्टम विभागाने पकडून आणली. या बोटीतून 24 हजार लिटर डिझेल साठा जप्त करण्यात आला आहे.
या बोटाया मालकाचे नाव समजलेले नाही. या बोटीवर 4 खलाशी होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता रात्री समुद्रामध्ये मोठय़ा व्हेसलमधून डिझेल या बोटीत उतरून घेतल्याचे निष्पन्न झाले. या बोटीमध्ये एकूण 17 कंपार्टमेंट असून त्यामधील 2 कंपार्टमेंट रिकामे होते, तर उर्वरीत 15 कंपार्टमेंटमध्ये साधारण 24 हजार लिटरचा डिझेल साठा असल्याचे सांगण्यात येते.
मागील महिन्यापासून समुद्रात परदेशी बोटींमधून भारतीय बोटींच्या माध्यमातून डिझेल तस्करी होते अशी माहिती कस्टम विभागाला मिळाली होती आणि काही दिवसांत 50 मेट्रीक टन डिझेलची तस्करी होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर रत्नागिरी कस्टम टिमने सापळा रचून हर्णे-गुहागर समुद्री लाईनदरम्यान 4/5 नॉटिकल माईलमध्ये दुपारी 1.30ाया दरम्यान ही बोट भरुन झालेले डिझेल नेत असताना पकडली व त्यात तस्करीचे डिझेल असल्याच्या संशयावरून दाभोळ बंदरामध्ये आणली. रत्नागिरी कस्टम विभागाचे डेप्युटी कमिशनर अमित नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.