ऑनलाईन टीम / मुंबई
आदिस अबाबाहून मुंबई येथे 240 कोटी रुपयांच्या 35 किलो हेरॉईनची तस्करी करणाऱ्या नवी मुंबईतील हर्षद गजरा याच्यावर सीमाशुल्क विभागाने अटकेची कारवाई केली आहे.
हेरॉईनची तस्करी प्रकरणात नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील हर्षद गजरा याला सीमाशुल्क विभागाने अटक केली. ही कारवाई शनिवार दि. ११ डिसेंबर रोजी करण्यात आली. यावेळी अधिका-यांनी आरोपींना अटक करत कोर्टात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी तपासात मुंबईतील काही प्रमुख व्यावसायिकांचीही झडती घेतली.
सीमाशुल्क विभागातील एका अधिकाऱ्याने यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, हे खोलवर रुजलेले जाळे असुन, या ड्रग प्रकरणात अनेक बडे लोक सामील असण्याची शक्यता ही यावेळी व्यक्त केली. तसेच या प्रकरणी पुढील तपास प्रगतीपथावर आहे. आणि सद्यस्थितीत सर्वकाही स्पष्ट करणे तपाच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही, दुसर्या अधिकाऱ्याने सांगितले की त्यांनी हर्षद गजरा याला ताब्यात घेण्याच्या कटात सामिल होत संगनमत केल्याबद्दल अटक केली असुन वाहतूक आणि एनडीपीएस कायद्यानुसार आरोपींवर गुन्हा केला आहे.