Tarun Bharat

25 कोटींच्या चरससह नेपाळी तस्कर ताब्यात

Advertisements

7 जणांना अटक : बॉलिवूड कनेक्शनचा संशय, तपास सुरू

मोतीहारा :

बिहारमधील पूर्व चंपारणमध्ये चरसचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. जिह्यातील चकिया टोल प्लाझा येथून पोलिसांनी 25 कोटी रुपयांचे चरस जप्त केले आहे. स्विफ्ट डिजायर कारच्या तपासणी दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. कारची तपासणी केली असता त्यात चरस सापडले. पोलिसांनी चरस साठय़ासह एकूण सात जणांना अटक केली आहे.

एसपी नवीनचंद्र झा यांनी जप्त केलेल्या चरसच्या बॉलिवूड कनेक्शनबाबतही शंका उपस्थित केली आहे. या कारवाईची माहिती देताना ते म्हणाले की, गुप्त माहितीच्या आधारे टोल प्लाझावर वाहनांची चौकशी केली जात होती. याच दरम्यान पोलिसांना एका गाडीतून 52 पॅकेटमध्ये ठेवलेले 25 किलो चरस सापडले. कारमधून महाराष्ट्रातील रहिवासी उस्मान सफी आणि विजयवंशी पर्षद यांना अटक केली आहे. त्यानी दिलेल्या माहितीवरून सात जणांना अटक करण्यात आली आहे.

चरस नेपाळहून रक्सौलमार्गे मुंबईला पाठवले जात होते, त्यामुळे त्याच्या मुंबई आणि बॉलिवूडशी संबंधाबाबतही चौकशी केली जात आहे. अटक केलेल्या तस्करांनी पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीत यापूर्वीही दोनदा चरसचा मोठा साठा मुंबईला पाठवण्यात आल्याचे म्हटले आहे. त्याचाही तपास युद्धपातळीवर सुरू आहे.

Related Stories

गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे नाव बदण्याची सूचना

Patil_p

बाबा रामदेव यांच्यावर आयएमए नाराज

Patil_p

पंजाबमध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 11, 739 वर

Rohan_P

दिल्लीत कोरोनाचा उद्रेक : सीबीएसई परीक्षा रद्द करा; केजरीवाल यांची मागणी

Rohan_P

वैद्यकीय मंत्र्यांचे उत्तर; विरोधकांचा सभात्याग

Omkar B

मे मध्ये जीएसटी संकलन समाधानकारक

Patil_p
error: Content is protected !!