Tarun Bharat

25 वर्षांच्या जावयाशी 50 वर्षांची सासू विवाहबद्ध

Advertisements

मुझफ्फरनगर जिल्हय़ातील होराकला पोलीस स्थानक क्षेत्रात अनोखी घटना घडली आहे. 50 वर्षाची एक सासू आपल्या 25 वर्षाच्या जावयाच्या प्रेमात पडल्याने त्यांनी पळून जाऊन विवाह केला. त्यांच्या प्रेमाला त्या महिलेचा पती आणि तिचीच विवाहित मुलगी यांनी विरोध केल्याने त्यांनी पळून जाऊन विवाह केला. आता पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

या महिलेच्या मुलीचे लग्न गावातीलच एका युवकाशी दोन वर्षापूर्वी झाले. तथापि, सासूचेच आपल्या जावयावर प्रेम बसले. जावयानेही ते स्वीकारले. त्यामुळे घरात मोठाच बाका प्रसंग निर्माण झाला. सर्व नातेवाईकांनी या संबंधांना कडाडून विरोध केला. त्यामुळे संधी साधून दोघेही पळून गेले. दहा महिन्यांनंतर ते पुन्हा घरी परतले आणि आपण कोर्ट मॅरेज केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या महिलेची कन्या आणि तिचा पती यांनी तक्रार केली. यावर या नवविवाहित दांपत्याने घरात प्रचंड गोंधळ घातला. अखेरीस त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. हा विवाह आता गावात चर्चेचा विषय बनला असून कायद्याच्या कुठल्या कलमाखाली त्यांच्यावर कारवाई करावी, या विचारात पोलीस आहेत.

Related Stories

90 वर्षांच्या कारमधून पालथे घातले जग

Patil_p

तरुणाईने दिला नो कोरोना आणि दारु नको दूध प्या… चा संदेश

Rohan_P

पावसाचे गाव, मेघालय त्याचे नाव!

Patil_p

बेघर व्यक्तीचे अनोखे मांजर प्रेम

Patil_p

स्मरणशक्ती वाढविणारे हेल्मेट

Amit Kulkarni

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर लवकरच बायोपिक

prashant_c
error: Content is protected !!