बेळगाव : येथील शौर्य चौकजवळील महात्मा गांधी यांच्या स्मारकाची व आजूबाजूच्या परिसराची जाधवनगर येथील 25 कर्नाटक बटालियनच्या विद्यार्थ्यांच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी बी. के. मॉडेल हायस्कूल व सेंट मेरी हायस्कूलचे एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित होते. एनसीसीची विद्यार्थिनी पूर्वी होसमनी आणि वेद मुचंडीकर या दोघा योद्धय़ांनी केलेल्या त्यागाबद्दल, त्यांच्या देशभक्तीबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी 25 कर्नाटक बटालियनचे कर्नल अभय अवस्थी, एडम ऑफिसर राजीव सहानी, सेंट मेरी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जास्मिन रुबडी, बी. के. मॉडेल शाळेच्या मुख्याध्यापिका शैला चाटे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी एनसीसी विद्यार्थ्यांबरोबर बी. के. मॉडेल व सेंट मेरीज शाळेचे एनसीसी अधिकारी निशा पाटील आणि रवी घाटगे, केअर टेकर मोहन देमनी आदी उपस्थित होते.