Tarun Bharat

खानापूर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांसाठी 25 कोटीचा निधी मंजूर

आमदार अंजली निंबाळकर यांचे प्रयत्न : निविदा लवकरच निघणार

खानापूर : खानापूर तालुक्मयातील ग्रामीण रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम खाते तसेच पीआरएडी खात्यांतर्गत 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आल्याची माहिती आमदार अंजली निंबाळकर यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.

तालुक्मयातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते गेल्या दोन वर्षात झालेल्या मोठय़ा पावसाने खराब झाले आहेत. शासनदरबारी प्रयत्न करून गावांच्या रस्त्यांसाठी निधी मंजूर करून आणला आहे. या कामाच्या निविदा लवकरच निघणार आहेत. पावसाळय़ानंतर कामाला सुरुवात होणार आहे.

मंजूर निधी कसबा-नंदगड, नंदगड-झुंजवाड रस्ता डांबरीकरणासाठी दीड लाख रुपये, हेम्माडगा-सिंधनूर राज्य मार्गापैकी शिरोलीजवळ खराब झालेल्या एक किलोमीटर तसेच तोलगी ते क-बागेवाडी दरम्यानच्या रस्त्यासाठी 4 कोटी 50 लाख, नागरगाळी ते करजगी क्रॉसदरम्यान 1.50 लाख, गोल्याळी शाळा ते बाकनूर रोड 1 कोटी, गोल्याळी क्रॉस ते तोराळी कोब्रा कॅम्प 2 कोटी,  गुंजी-भालके-शिंपेवाडी-करंजाळ-हलसाल जोड रस्त्यासाठी 4 कोटी, कापोली-शिवठाण-कोडगई रस्ता विकासासाठी 2 कोटी, तिवोली-नेरसा रस्त्यासाठी दीड कोटी, दोड्डहोसूर ते येडोगा ऍप्रोच रोड एक कोटी तर इदलहोंड गावाला जोडणाऱया ऍप्रोच रस्त्यासाठी 1 कोटी असा एकूण 20 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

राज्यमार्ग विकास मंडळाकडून 10 कोटी मंजूर

 हलशी ते हलगा-मेरडा या रस्त्यासाठी 5 कोटी, बिडी-कक्केरी-लिंगनमठ रस्त्यासाठी 5 कोटी मंजूर झाले आहेत. आणखी काही ग्रामीण रस्त्यांसाठी निधी मंजुरीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तालुक्मयाच्या हद्दीतून जाणारे राज्य मार्ग खराब झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.

Related Stories

आनंद अकादमी अ चा 195 धावांनी मोठा विजय

Amit Kulkarni

बकऱयांचा बाजार तेजीत

Patil_p

शिरहट्टी येथे एका रात्रीत सहा ठिकाणी घरफोडी

Patil_p

मोटार सायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

Patil_p

पत्रलेखनातील जीएंचे व्यक्तिमत्त्व आगळेवेगळे

Omkar B

बेंगळूरमध्ये बिहारी कामगारामुळे 9 जणांना संसर्ग

Tousif Mujawar