ट्रक्टर-ट्रॉली तलावात कोसळून दुर्घटना
कानपूर
उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्हय़ात घाटमपूर येथे शनिवारी संध्याकाळी उशिरा एक भीषण अपघात झाला. भाविकांनी भरलेली ट्रक्टर-ट्रॉली अनियंत्रित होऊन तलावात उलटली. या अपघातात 25 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती रात्री उशिराने देण्यात आली. मृतांमध्ये 11 मुलांचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले. तसेच 10 हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी ग्रामस्थ आणि पोलीस बचावकार्यात गुंतले होते. सर्व भाविक फतेहपूर येथील चंद्रिका देवी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. ट्रॉलीमध्ये सुमारे 40 लोक होते. परतत असताना साध ते गंभीरपूर गावादरम्यान रस्त्यालगतच्या तलावात ट्रॉली पलटी झाली. तीन दिवसांपूर्वीही राज्यात असाच एक मोठा रस्ते अपघात घडला होता.