Tarun Bharat

वाहतूक नियम तोडणाऱया 25 हजार वाहनचालकांना दंड

फोंडय़ाचे वाहतूक निरीक्षक कृष्णा सिनारी यांची माहिती

जगन्नाथ मुळवी /मडकई

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या सहा महिन्यात फोंडा वाहतूक पोलिसांनी दुचाकी व चारचाकी मिळून 25 हजार 97 वाहनचालकंना दंड ठोठावला.  त्यातून जानेवारी ते जूनपर्यंत रु. 71 लाख 56 हजार 650 एवढा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला. नव्यानेच फोंडा वाहतुक कार्यालचा ताबा घेतलेले निरीक्षिक कृष्णा सिनारी यांनी ही माहिती दिली.

 वाहतुक कायद्याचे पालन करण्यासाठीच कायदा असतो. मात्र पंचविस हजार चालकांपैकी 4 हजार 180 जणांनी हेल्मेट घातले नव्हते. तर काही जण हेल्मेट असूनही ते घालण्यासाठी टाळाटाळ करून अपघाताला निमंत्रणे देतात. दुचाकीच्या टाकीवर हॅल्मेट ठेवलेली असतात. पोलीस समोर दिसताच वाहन थांबवून चालक हॅल्मेट डोक्यावर घालतात. दंड चुकवण्यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड अपघात होऊन जीवावर बेतू शकते, असे निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी सांगितले. गतीवर नियंत्रण ठेवून वाहने हाकल्यास वाहन चालकांचे जीवन सुरक्षित होईल. त्यासाठीच कायदे केले आहेत. काही युवक गतीची मर्यादा ओलांडून वाहने हाकतात. परमेश्वरानी दिलेले हे  आयुष्य वाहने वेगवान व निष्काळजीपणे चालवून वाया घालवताना दृष्टीस पडतात. नियमभ्ंाग म्हणून 987 जणांना तर अत्यंत धोकादायक स्थितीत वाहने चालवली व कायदा तोडल्यामुळे 142 जणांना दंड भरावा लागला. वाहने चालवताना भ्रमणध्वनीवर बोलत असताना चालक स्वतःचे प्राण गमावतात व त्याचबरोबर ते अन्य नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण करतात. वाहन चालवताना भ्रमणध्वनीवर बोलणाऱया 75 चालकांना दंड ठोठावण्यात आला.

वाहन चालकांकडून नियभभंग होत असल्यामुळे चालकाचा परवाना निलंबीत करण्याची कायद्यात तरदूत आहे. त्या आधारे 4 हजार 110 वाहन चालकांचा  परवाना निलंबीत करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे. वाहन परवाना नसलेल्या 29 जणांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करून घेतल्याची माहिती त्यांनी दिली. पार्किंगच्या जागेत वाहने पार्क न करता बेपर्वाईने धोकादायक ठिकाणी वाहने पार्क करून अनेकजण कामावर जातात. अशा 3 हजार 912 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. कारगाडय़ांच्या खिडक्यांना फिल्मिंग करण्याचे प्रकार वाढत आहेत. असा गुन्हा करणाऱयांना दंड देताना 2 हजार 884 जणांवर कारवाई करण्यात आली.

वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलीस कार्यरत असतात. ज्या माणसाकडे सुशिक्षीतपणा, संस्कार व शिस्त असते तिच माणसे वाहतूक नियम व कायद्याचे पालन करीत असतात. समजूदारपणे काम केल्यास कुठलाच अडथळा उद्भवत नसतो. आल्मेदा हायस्कूलजवळ सकाळी व दुपारच्या वेळी वाहतुकीवर ताण येतो. त्यावर उपाययोजना सुरु आहे. फोंडा जीव्हीएमस कॉलेज व फर्मागुडीच्या पीईएस कॉलेज तसेच गोपाळ गपणती देवस्थानात येणाऱया भक्तांमुळे वाहतुकीवर ताण पडत असतो. ही समस्या हल करण्यासाठी पोलीस त्यांच्या सेवेची चोख व्यवस्था बजावत असतात. फोंडा पालिकेशी पत्र व्यवहार करून पार्किंगच्या जागा आखून देण्यासाठी विनंतीवजा पत्र पाठविलेले आहे. त्यांनी सहकार्य केल्यास फोंडय़ातील पार्किगचा प्रश्न सुटेल, अशी अशा निरिक्षक सिनारी यांनी व्यक्त केले.

Related Stories

‘त्या’ महिलेची ओळख उघड करणे अयोग्यच

Amit Kulkarni

अ.गोमंतक नाभिक समाजाच्या समितीपदी पहिल्यांदाच महिला अध्यक्ष

Amit Kulkarni

प्रलंबित मागण्या त्वरीत पूर्ण करा

Amit Kulkarni

लॉकडाऊन वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव

Patil_p

रुमडामळ पंचायतीत मिनी बाजार संकुलाचे उद्घाटन

Amit Kulkarni

माजी आमदार तिओतीन परेरा यांचे निधन

Amit Kulkarni