Tarun Bharat

26 एप्रिलपासून सीबीएसई 10वी, 12वी टर्म-2 परीक्षा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सीबीएसईने इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या टर्म-2 परीक्षेची तारीख बुधवारी जाहीर केली. ही परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू होणार असून विषयनिहाय वेळापत्रकही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नमुना पेपरनुसार प्रश्नपत्रिका काढल्या जाणार असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थी बोर्डाच्या वेबसाईटवरून नमुना पेपर डाऊनलोड करू शकतात. तसेच परीक्षा वेळापत्रकही बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड केले जाणार असल्याचे मंडळाने कळवले आहे.

कोरोना महामारीमुळे सीबीएसई 10 वी आणि 12 वीची परीक्षा दोन टर्ममध्ये घेतली जात आहे. डिसेंबरमध्ये पहिल्या टर्मच्या परीक्षा झाल्या आहेत. त्यानंतर आता टर्म-2 परीक्षा एप्रिल महिन्याच्या अखेरीस होणार आहेत. तथापि, पहिल्या टर्म परीक्षेचे विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.

Related Stories

बिहारमध्ये खुल्या जागेवर नमाज पठण बंद होणार?, मुख्यमंत्री म्हणाले…

Archana Banage

न्यायाधीश रमण होणार नवे सरन्यायाधीश

Patil_p

बिहारी कामगारांवर काश्मीरमध्ये गोळीबार

Patil_p

पेट्रोल-डिझेल दरात किरकोळ कपात

Patil_p

सर्वच क्षेत्रांमध्ये वाढली महिलांची भागीदारी ः पंतप्रधान

Patil_p

विनाअनुदानित सिलिंडर 162 रुपयांनी स्वस्त

Patil_p