Tarun Bharat

26 जानेवारीला झळकणार ‘अटॅक’

Advertisements

अभिनेता जॉन अब्राहमचा चित्रपट ‘अटॅक’ 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. जॉन अब्राहमनेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ऍक्शनने नटलेल्या या चित्रपटात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत देखील दिसून येणार आहे. लक्ष्य राज आनंद यांच्या दिग्दर्शनात निर्माण झालेला हा चित्रपट यापूर्वी 14 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण कोरोना महामारीमुळे याचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते.

चित्रपटाची निर्मिती अब्राहम, जयंतीलाल गडा आणि अजय कपूर यांनी मिळून केली आहे. याचदरम्यान जॉनने अलिकडेच मोहित सुरीच्या ‘एक व्हिलेन रिटर्न्स’च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. हा चित्रपट 8 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. तसेच जॉन हा मिलाप मिलन जावेरी यांच्या ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटातही दिसून येणार आहे. हा चित्रपट 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

सध्या हव्वा ‘धुरळा’चीच

Patil_p

गुमराह’मध्ये मृणाल ठाकुर मुख्य भूमिकेत

Patil_p

ऐश्वर्या रजनीकांत अन् धनुष विभक्त

Patil_p

‘आरसी-15’मधून झळकणार कियारा

Tousif Mujawar

क्रिमिनल जस्टिसचा तिसरा सीझन लवकरच

Amit Kulkarni

शिवानी सुर्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

prashant_c
error: Content is protected !!