Tarun Bharat

सातारा येथील व्यावसायिकाची २६.४३ लाखांची फसवणूक

४० टन माल केला लंपासच दुसऱ्याच्या व्यवसायाचे नाव व जी. एस. टी. नंबर वापरून केली फसवणूक

प्रतिनिधी/नागठाणे

दुसऱ्याच्या व्यवसायाचे नाव व जी.एस.टी नंबर वापरून निनाम (ता.सातारा) येथील कंपनीतून 40 टन लोखंडी सळ्यांची ऑर्डर देत माल उचलून पैसे न देऊन फसवणूक केल्याची फिर्याद विठ्ठल गोविंद कुलकर्णी(वय.45, रा.मूळ.चचेगाव, ता.कराड. जि. सातारा, हल्ली रा. पुणे) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. आहे.

फसवणुकीचा हा आकडा 26 लाोख 43 हजार 200 रुपये एवढा असून पोलिसांनी या प्रकरणी अरुण उर्फ प्रशांत शंकर जाधव ( रा. सुरभी कॉलनी, वारडे-माळवाडी, पुणे) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल कुलकर्णी यांचे निनाम (ता.सातारा) येथे कच्च्या लोखंडापासून बांधकामाला लागणाऱ्या सळई बनविण्याचा कारखाना आहे. डिसेंबर 2021 मध्ये त्यांना अरुण उर्फ प्रशांत जाधव याने संपर्क साधून लोखंडी सळयांची ऑर्डर दिली. त्यासाठी अरुण उर्फ प्रशांत जाधवने वाघेश्वर नावाची फर्म असल्याचे सांगून त्या व्यवसायाचा पत्ता व जी.एस.टी नंबर सांगून बिल बनविण्यास सांगितले.
अरुण उर्फ प्रशांत जाधव याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विठ्ठल कुलकर्णी यांनी 4 डिसेंबर 2021 रोजी 20 टन व 9 डिसेंबर 2021 रोजी 20 टन असा सुमारे 40 टन लोखंडी सळयांची 26 लाोख 43 हजार 200 रुपये किंमतीची ऑर्डर जाधव याला पाठविली. मात्र ऑर्डर घेतल्यानंतर ठरलेल्या मुदतीत पैसे न आल्याने विठ्ठल कुलकर्णी यांनी त्यांना पैश्याची मागणी केली. यावेळी त्याने काही महिन्यांची मुदत मागितली. मात्र खूप वेळ देऊनही पैसे न दिल्याने विठ्ठल कुलकर्णी हे ज्या फर्मच्या नावाने ऑर्डर दिली होती त्या पत्त्यावर गेले.

हे ही वाचा : डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर

तेथे घेल्यावर वाघेश्वर फर्म ही अरुण उर्फ प्रशांत जाधव याची नसून तिचे खरा मालक विजय गायकवाड असल्याचे आणि जाधवने 20 टन लोखंडी सळ्या गायकवाड यांना विकून त्याचे संपूर्ण पैसेही घेतल्याचे समजले. तसेच अरुण उर्फ प्रशांत जाधव याने दिलेला धनादेशही बैंकेत वटला नाही. त्यामुळेदुसऱ्याच्या फर्मचे नाव व जी.एस.टी नंबर देऊन फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात धाव घेत अरुण उर्फ प्रशांत जाधव याच्याविरुद्ध गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.याचा अधिक तपास प्रभारी सपोनि सी.एम.मछले करत आहेत.

Related Stories

सोमर्डी आरोग्य केंद्रात रुग्णांना चांगली सेवा द्या – आ. शिवेंद्रसिंहराजे; सिव्हील सर्जन डॉ. गडीकर यांना केल्या सुचना

Archana Banage

हुमणीचे एकात्मिक नियंत्रण अल्पखर्चिक आणि प्रभावी

Patil_p

साताऱयात पूर्वप्राथमिक शिक्षिका, सेविका संघाचे आंदोलन

Patil_p

पांगारी येथे बिबट्या मृतावस्थेत आढळला

datta jadhav

म्हसवड- वरकुटे रस्ता दुपदरीकरणाचे मंजूर काम सुरु करण्याची मागणी

Patil_p

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील विरांगना व समाजवादी नायिकाना शहरात अभिवादन

Patil_p