ऑनलाईन टीम / तरुण भारत :
26 Congress leaders join BJP in Himachal Pradesh एकीकडे ‘भारत जोडो यात्रा’ सुरू असताना आणि हिमाचल प्रदेशची निवडणूक जाहीर झालेली असतानाच काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे. हिमाचल प्रदेशातील तब्बल 26 बड्या नेत्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले असून, हा काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचे मानले जाते. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. भाजपाच्या सत्तेला आव्हान देण्याच्या निर्धाराने काँग्रेस मैदानात उतरले आहे. मात्र, मतदान अवघ्या चार दिवसांवर आले असतानाच काँग्रेसच्या 26 बड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. या नेत्यांमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव धरमपाल ठाकूर खंड यांचाही समावेश आहे. नेत्यांच्या पक्षप्रवेशावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, भाजपाचे हिमाचल प्रदेश निवडणूक प्रभारी सुधान सिंग, भाजपाचे शिमल्यातील उमेदवार संजय सूद हे या पक्षप्रवेशावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा : राज्यात गारठा वाढला
काँग्रेसमधून भाजपमध्ये इनकमिंग झाल्यानं सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास वाढला आहे. जयराम ठाकूर यांनी या पक्षप्रवेशाचे फोटो ट्विटरवर शेयर करत हिमाचल प्रदेशातील भाजपाच्या ऐतिहासिक विजयासाठी आपण सगळे मिळून काम करुया, असं म्हटलं आहे.