Tarun Bharat

म्हणून साजरा करतात ‘कारगिल विजय दिवस’

3 मे 1999 रोजी काशिनाम गयाल नावाच्या एका व्यक्तीची याक हरवली होती. त्याने दुर्बिणीतून बघितले तर काही व्यक्ती एका टेकडीवर बंदूक आणि हत्यारे घेऊन फिरत होते. ते भारतीय सैनिक नाहीत हे त्याच्या लक्षात आलं. काहीतरी चुकीचं घडतंय हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांने इंडियन आर्मीला सांगितलं. शहनिशा केली तेव्हा पाकिस्तानच्या मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू होती. असं भारतीय सैनिकांना आढळून आलं. पाकिस्तानी सैनिक भारताच्या सीमेवरून आत प्रवेश केला होता. भारतीय सैनिक काउंटर अटॅक सुरू करतात. तेव्हा भारत – पाकिस्तान युद्ध सुरू होतं. त्या युद्धाला आपण आज कारगिल युद्ध म्हणून ओळखतो.

या कारगिल युद्धातील मोस्ट पॉप्युलर हिरो होते कॅप्टन विक्रम बत्रा. भारत ऑपरेशन विजय अंतर्गत पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करतो. तर सफेद सागर या नावाने 26 मे 1999 रोजी हवाई हल्ला सुरू केला जातो. भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानी सैनिक भारतात आल्याने एलओसी क्रॉस न करता आपल्या देशाचे संरक्षण भारत करत आहे. हे आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखवले गेले. टोलो लिंक नावाच्या टेकडीवर पाकिस्तानी सैन्य कब्जा करून होतं. जिथे ( -5 ) ते ( -11 ) एवढे तापमान असतं. या परिस्थितीमध्ये टेकडीवर चढणे भारतीय सैनिकांना शक्य नव्हतं. तरी देखील कॅप्टन अजित यांच्या नेतृत्वाखाली या टेकडीवर भारतीय सैन्य चढत होतं.

टेकडी चढण्यासाठी 15 फूट अंतर असताना पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला. 16000 फूट वर असणारी टेकडी 1000 फूट राहिली असताना सैनिक मध्यभागी अडकले. त्या सैनिकांना संरक्षण देणे ही भारतीय जवानांची प्रायोरिटी होती. कर्नल रवींद्रनाथ यांच्या नेतृत्वाखाली 90 सैनिकांसह रिकॅप्चर करण्यासाठी 12 जूनला 8 वाजता सैनिकांपर्यंत पोहोचले. भारतीय सैनिकांच्या अर्जुन, भीम, अभिमन्यू या नावाने तीन टीममध्ये विभागले गेले. 10 हजार सेल्स व 120 पेक्षा जास्त आर्टिलरी बंदूकने फायरिंग सुरू झाली. त्याला ‘बरबाद बंकर’ असे नाव देण्यात आले. या टेकडीवर मेजर विवेक गुप्ता व 6 सोल्जर शहीद झाले. परंतु या टेकडीवर भारतीयांनी कब्जा मिळवला. या टेकडीनंतर रॉकी नोब 0.514 बेसवर भारतीय सैनिक पोहचले. शेरशाहा या नावाने कर्नल योगेश कुमार जोशी यांच्या नेतृत्वाखाली ग्रुप तयार करण्यात आला. यामध्ये संजीव सिंग जंबाल व विक्रम बत्रा यांचे दोन ग्रुपमध्ये विभाजन केले गेले. संजीव सिंग यांचा ‘ओ या या’ सक्सेस कोड देण्यात आला. तर कॅप्टन विक्रम बत्रा यांचा येथील ‘ये दिल मांगे मोर’ हा सक्सेस कोड देण्यात आला. या टेकडीवर देखील भारतीयांनी विजयाचा झेंडा फडकवला.

तिसरी सगळ्यात महत्त्वाची टायगर हिल टेकडी 3 व 4 जुलै रोजी ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव हे 22 सोल्जर घेऊन अर्ध्यावर पोहोचले वरून फायरिंग सातत्याने सुरू झाले. तरीही योगेंद्रसिंह यादव टेकडीवर चढत होते 940 फूट वर चढल्यानंतर त्यांना तीन बुलेट लागल्या, तरी त्यांनी टेकडीवर चढत 4 पाकिस्तानी सैनिकांना मारले. पॉईंट 4875 विक्रम बत्रा यांनी 8 जुलै 1999 रोजी ही टेकडी जिंकली. परंतु यामध्ये अनुज नायर व विक्रम बत्रा शहीद झाले. 14 जुलै 1999 रोजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी विजयाची घोषणा केली. 26 जुलै 1999 रोजी पाकिस्तानी सैनिक भारतातून माघार घेऊन पळून गेले आहे, म्हणून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.

Related Stories

आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच सोनं लूटणार-दीपक केसरकर

Archana Banage

बुलढाण्यात राहुल गांधींच्या सभेत अज्ञाताने फोडले फटाके; सभा बंद पाडण्याचा केला प्रयत्न

Archana Banage

…म्हणुन भाजप, काँग्रेसवाले मला शिव्या द्यायला लागले – अरविंद केजरीवाल

Abhijeet Khandekar

2002 मध्ये धडा शिकविल्यावर शांतता प्रस्थापित

Patil_p

‘सन्नाटा’ झाला शांत ; अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन

Archana Banage

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी ‘ते’ वृत्त चुकीचं ; पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण

Archana Banage