गोवा / प्रतिनिधी
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांचा शपथविधी सोहळा 28 मार्च रोजी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले की, 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये हा सोहळा होणार आहे.
पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपशासित सात राज्यांचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले.