नव्याने 104 पॉझिटिव्ह : सक्रिय संख्या 888 : आठजणांची प्रकृती चिंताजनक
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात कोरोना नमुना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून आतापर्यंत 28 हजार 71 जणांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत 4 हजार 164 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. पैकी 3 हजार 173 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत 888 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. पैकी आठ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. मंगळवारी आणखी 104 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 41 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी येथे दिली.
जिल्हय़ात सध्या कोविड प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणी आणि ऍन्टीजेन म्हणजेच रॅपिड तपासणी केली जाते. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 28 हजार 71 कोरोना नमुना चाचण्यांमध्ये आरटीपीसीआरच्या 17 हजार 248 तपासण्या झाल्या. त्यामध्ये 3 हजार 76 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर रॅपिड तपासणीत एकूण 10 हजार 823 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1 हजार 144 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
जिल्हय़ात आणखी 104 पॉझिटिव्ह
कोरोना वाढीचा वेग मंदावलेला असताना मंगळवारी पुन्हा 104 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 4 हजार 164 झाली आहे. तर 41 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 3 हजार 173 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सद्यस्थितीत 888 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील आठ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. पैकी तीन रुग्ण ऑक्सिजनवर आणि पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
मंगळवारी नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 104
सद्यस्थितीतील सक्रिय रुग्ण 888
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 3173
आतापर्यंत मृत झालेले रुग्ण 103
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह 4164
पॉझिटिव्हपैकी चिंताजनक 8
कणकवली तालुक्मयात सर्वाधिक 1382 रुग्ण
देवगड तालुक्मयात एकूण 267
दोडामार्ग तालुक्मयात एकूण 173
कणकवली तालुक्मयात एकूण 1382
कुडाळ तालुक्मयात एकूण 909
मालवण तालुक्मयात एकूण 300
सावंतवाडी तालुक्मयात एकूण 523
वैभववाडी तालुक्मयात एकूण 136
वेंगुर्ले तालुक्मयात एकूण 359
जिल्हय़ाबाहेरील रुग्ण 13
सर्वाधिक मृत्यू सावंतवाडी तालुक्मयात
देवगड तालुक्मयात एकूण 06
दोडामार्ग तालुक्मयात एकूण 02
कणकवली तालुक्मयात एकूण 22
कुडाळ तालुक्मयात एकूण 18
मालवण तालुक्मयात एकूण 11
सावंतवाडी तालुक्मयात एकूण 27
वैभववाडी तालुक्मयात एकूण 08
वेंगुर्ले तालुक्मयात एकूण 08
जिल्हय़ाबाहेरील रुग्ण 01