Tarun Bharat

देवदर्शनाला निघालेली ट्रॅव्हल्स पलटी; 28 भाविक जखमी, एकाचा मृत्यू

ऑनलाईन टीम / तरुण भारत : 

पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेली ट्रॅव्हल्स चालकाच्या निष्काळजीपणामुळे पलटी झाली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील 28 भाविक जखमी झाले असून, एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील येड्राव फाटा येथे आज सकाळी हा अपघात झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशातील 38 भाविकांना घेऊन खासगी ट्रॅव्हल्स पंढरपूरला निघाली होती. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा तालुक्यातील येड्राव फाट्यावरून ही ट्रॅव्हल्स जात होती. यावेळी चालक मोबाईलवर बोलत होता त्यामुळे भरधाव वेगतील ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी बचावकार्य हाती घेतले. जखमींना तात्काळ बाहेर काढून जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या अपघातात ट्रॅव्हल्समधील 28 भाविक जखमी झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला असून, 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. 

Related Stories

औरंगाबाद डंपर-खासगी बसच्या अपघातात डोळ्यादेखत माणसांचा झाला कोळसा,प्रत्यक्षदर्शीनी सांगितला घटनाक्रम

Archana Banage

करमाळा तालुक्यात वडिलांचा मुलांकडूनच खून

Archana Banage

महाबळेश्वर सुशोभिकरणाचा आराखडा नव्याने तयार होणार

Patil_p

जनमानसात कमालीची अस्वस्थता; छोट्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा

Tousif Mujawar

सातारा : नियम न पाळल्यास कारवाईचे अधिकार – जिल्हाधिकारी

Archana Banage

राज्यपालांनी पदावर राहण्याबाबत पुनर्विचार करावा

datta jadhav