ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये एका अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून चोरट्यांनी गोळीबार करत 28 लाख लुटले. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड परिसरातील एका इमारतीत अंगडिया व्यावसायिकाचे कार्यालय आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेले चोरटे कार्यालयात शिरले. या चोरट्यांनी अंगडिया कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. कर्मचाऱ्यांनी पैसे न दिल्याने चोरट्यांनी गोळीबार करत कर्मचाऱ्यांना धमकावले. त्यानंतर कार्यालयातील 28 लाख रुपयांची रोकड लुटून चोरटे पसार झाले.
अधिक वाचा : पाटलांच्या पोरांना लग्नाआधी पोरं, राजन पाटील यांची जीभ घसरली
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पळून गेलेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. परिसरात असलेल्या सीसीटिव्हीचे फुटेज पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले असून, त्यानुसार तपास सुरू केला आहे.