आज मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता
प्रतिनिधी / म्हापसा
पंचायत निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज भरण्याच्या तिसऱया दिवशी बार्देश तालुक्यातील एकूण 33 पंचायतीसाठी 29 अर्ज आले. गुरुवारी मोठय़ा प्रमाणात अर्ज सादर होण्याची शक्यता असून एकूण 7 पंचायतीमधून मंत्री, आमदार आपल्या कार्यकर्त्यांच्या पॅनलसह उपस्थित राहणार असल्याची माहिती हाती आली आहे. आज तिसरा दिवस अखेरीस एकूण अर्जाची संख्या 44 वर पोचली आहे.
अद्याप प्रस्थापित सरपंच, उपसरपंच यांनी आपापले उमेदवारी अर्ज सादर केले नाही. अनेक आजी माजी तसेच नवीन चेहऱयांनी बार्देश मामलेदार कचेरीत येऊन अर्ज निर्वाचन अधिकाऱयाकडून घेऊन गेले आहे. बहुतेकांनी आपण उमेदवारी गुरुवारी सादर करणार तर काहींनी अर्ज भरण्यासाठी शुक्रवार हा दिवस निवडल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.
सर्वांच्या आशीर्वादाने रिंगणात – नीशा साळगावकर
कळंगूट वॉर्ड क्रमांक 3 मधून अर्ज सादर केल्यावर नीशा प्रशांत साळगावकर म्हणाल्या की, नाईकवाडा हा वॉर्ड महिलांसाठी राखीव आहे. आपल्याच प्रभागातील ग्रामस्थांनी माझे नाव पुढे केले. त्यामुळे सर्वांच्या आशीर्वादाने रिंगणात उतरले आहे. या वॉर्डात खूप कामे बाकी असून ती पूर्णत्वाकडे नेण्याचा आपला प्रयत्न असेल.
ग्रामस्थ आपल्यास तिसऱयांदा कौल देणार– केल्फा फर्नांडिस
हडफडे पंचायतीचे माजी पंच केल्फा म्हणाले, आपला वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या विनंतीवरून आपण बहीण स्टेफी फातिमा मारिओ फर्नांडिस यांना रिंगणात उतरविले आहे.
कांदोळी पंचायत : वॉर्ड क्रमांक 1- लॉरेन्स कायतानो सिल्वेरिया, वॉर्ड क्रमांक 4- विष्णूदुलौ नाईक. हडफडे-नागवा पंचायत : क्रमांक 1- आशा राजेंद्र पालयेकर, जोसफीना परपेट पॉली डिसोजा, वॉर्ड 5- अनिता जोसेफ फर्नांडिस, स्टेफी फातिमा मारिओ. पर्रा पंचायत : वॉर्ड क्रमांक 1- कमला श्रीकृष्ण निंगुडकर. पोंबुर्फा वळावली पंचायत : वॉर्ड क्मरांक 5- इमिडिओ फेलिक्स डिसिल्वा. रेईस मागूस पंचायत : वॉर्ड क्र. 11- सिद्धी शंतनू भोसले. सडये-शिवोली पंचायत : वॉर्ड क्र. 2- शिला पंढरीनाथ शिरोडकर. थिवी पंचायत : वॉर्ड क्र. 8- गिलबर्ड रॉबर्ट डिसौजा. वेर्ला-काणका पंचायत : वॉर्ड क्र. 4- दीपाली लक्ष्मीकांत बिचोलकर, वॉर्ड क्र. 7- दिक्षिता दिगंबर कळंगुटकर. साल्वादोर-द-मुंद पंचायत : वॉर्ड क्र. 5- कृष्णकांत दत्ताराम चोडणकर. पिळर्ण-मार्रा पंचायत : वॉर्ड क्र. 4- सुशांत नारायण सावळेकर, मंजिता सुशांत सावळेकर. कळंगूट पंचायत : वॉर्ड क्र. 3- शॅरोन आंतोनिओ सेबिस्ताव डिसोझा, वॉर्ड क्र. 8- आलेक्स जेरोम कुतिन्हो.
हळदोणा पंचायत : प्रभाग 1-साल्वादोर फर्नांडिस, प्रभाग 6-पिंकी केरकर, प्रभाग 3- अभिज्ञा सातार्डेकर, प्रभाग 7- सुभाष राऊत, प्रभाग 10- दीपक नाईक. गिरी पंचायतीच्या प्रभाग 2- मनिष नाईक व महेश चिदनकर, प्रभाग 3- निखिल हळर्णकर. उसकई पंचायतीच्या प्रभाग 2- सिमरन हुमबिगिरी.