न्हावेली / वार्ताहर
29th Monthly Program of Ajgaon Sahitya Katta
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा २९ वा मासिक कार्यक्रम रविवार दिनांक १९ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता आजगाव वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचा विषय ‘आवडलेली कांदबरी’ असून प्रमुख वक्ते उत्तम भागीत सर आहेत. भागीत सर हे आजगाव येथील विद्या विहार हायस्कूलचे मुख्याध्यापक असून या कार्यक्रमात ते व्यंकटेश माडगूळकर यांच्या बनगरवाडी या कादंबरी बद्दल बोलतील. बनगरवाडी कादंबरीतील सौंदर्यस्थळे, तिची परिणामकारकता आणि तिचे काळाच्या कसोटीवर स्थान आदी बाबी यावेळी चर्चिल्या जातील.तरी , या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आणि साहित्यचर्चा करणेसाठी सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.