Tarun Bharat

3 पोलीस कर्मचाऱयांची फ्रान्समध्ये हत्या, चौथा गंभीर

प्रारंभिक तपासानुसार दहशतवादी हल्ला नाही

वृत्तसंस्था / पॅरिस

फ्रान्समध्ये 3 पोलीस कर्मचाऱयांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली आहे. तर चौथा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. गोळीबाराची ही घटना मध्य पुय-डी-डोम भागात घडली आहे. फ्रान्सच्या पोलिसांनी संबंधित परिसरात तपास चालविला आहे. 

फ्रान्समध्ये ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. घरगुती हिंसाचाराची माहिती मिळाल्यावर हे पोलीस कर्मचारी तेथे पोहोचले होते. एका महिलेला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱया पोलिसांवर 48 वर्षीय व्यक्तीने अंदाधूंद गोळीबार सुरू केला होता. यात 3 पोलीस कर्मचाऱयांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर चौथा पोलीस जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित महिलेने गच्चीवर आश्रय घेतला होता. तर घरात आग लागली होती, असे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने गोळीबार केला होता.

Related Stories

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा 1 हजारपेक्षा कमी रुग्ण; अरविंद केजरीवाल म्हणाले …

Tousif Mujawar

लसीकरणासाठी एकाच मोबाईल क्रमांकवरून करा 6 सदस्यांची नोंदणी

Archana Banage

युवराजाला लस

Patil_p

ज्योतिरादित्य शिंदेंच्या जयविलास पॅलेसमध्ये दरोडा

Archana Banage

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 30 लाखांवर

datta jadhav

दहशतवादी कट उधळला; ISI च्या दोन दहशतवाद्यांना दिल्लीत अटक

datta jadhav