आईवडिल शेतावर – स्वतःच मास्क घालून पोहोचली डॉक्टरकडे
नागालँडच्या जुन्हेबोटो जिल्हय़ातील घटाशी तालुक्यात एक अनोखी घटना घडली आहे. येथील आरोग्य केंद्रात एक मुलगी स्वतःची तपासणी करण्यासाठी पोहोचली. एक दिवसापासून लिपवी या 3 वर्षीय मुलीला सर्दी-खोकल्याची सामान्य लक्षणे होती. तिचे आईवडिल शेतात गेले असल्याने तिने स्वतःच आरोग्य केंद्रात तपासणीसाठी जाण्याचा निर्णय घेतला.
चिमुकली लिपवी मास्क लावून आरोग्य केंद्रात पोहोचली. तेथे सामुदायिक आरोग्य अधिकाऱयाने तिची आरोग्य तपासणी केली आहे. या मुलीचे डॉक्टरसोबतचे छायाचित्र इंटरनेटवर प्रसारित झाले आहे. सोशल मीडियावर लोक या मुलीला जबाबदार आणि शूर ठरवत आहेत.
वैद्यकीय कर्मचाऱयांनी 3 वर्षीय लिपवीला आरोग्य केंद्रात पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱयावर हास्य उमटले. कथितरित्या तिला सर्दी-खोकल्याची लक्षणे जाणवत होती. पण तिचे आईवडिल शेतात कामावर गेले होते. अशा स्थितीत लिपवीने स्वतःच आरोग्य केंद्रात धाव घेतली. या ट्विटला आतापर्यंत 5 हजारांहून अधिक लाइक्स आणि 1 हजार रीट्विट मिळाले आहेत.
एकीकडे अनेक प्रौढ व्यक्ती स्वतःची कोरोना चाचणी करविणे आणि लसीकरण करण्यास टाळाटाळ करत आहेत. तर दुसरीकडे चिमुकल्या लिपवीने स्वतःच्या निरागसतेने आम्हा सर्वांना योग्य मार्ग दाखविला आहे.