रश्मि रॉकेट चित्रपट- देहबोलीसाठी 5-6 तासांचे प्रशिक्षण
तापसी पन्नूंकडे सध्या चित्रपटांची रांगच लागली आहे. एकाच कालावधीत तिचे क्रीडा पार्श्वभूमी असलेले दोन चित्रपट येत आहेत. एक क्रिकेटवरून ‘शाबास मिथू’ तर दुसरीकडे ‘रश्मि रॉकेट’ आहे. रश्मि रॉकेटमध्ये तापसीची व्यक्तिरेखा गुजरातच्या कच्छच्या दुर्गम भागातील आहे. कच्छच्या रणातील धावपटूची भूमिका ती साकारत आहे. तिच्यासारखे दिसण्यासाठी तापसीने प्रयत्न चालविले आहेत.
या चित्रपटात तापसी तीन वेगवेगळय़ा लुकमध्ये दिसून येणार आहे. पहिला लुक कच्छच्या रणाशी संबंधित युवतीचा आहे. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्यावरचा आहे. तर जगभरात प्रवास करणाऱया युवतीचा तिसरा लुक आहे.
चित्रपटाचे चित्रिकरण 4-5 शहरांमध्ये झाले आहे. महत्त्वाची दृश्ये मुंबई, पुणे, रांची आणि कच्छच्या रणामध्ये चित्रित झाली आहेत. लॉकडाउन मागे घेतल्यावर चित्रपटातील कलाकारही बदलावे लागले होते. रश्मि रॉकेटच्या व्यक्तिरेखेतील देहबोली प्राप्त करण्यासाठी तापसीला 5-6 तासांचे प्रशिक्षण घ्यावे लागत हेते.