मुंबई
विदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) मागच्या आठवड्यातून शेअरबाजारातून 3400 कोटी रुपये काढून घेतले होते. नोव्हेंबरच्या पहिल्या तीन सत्रात सदरची रक्कम काढून घेण्यात आली आहे. वाढत्या व्याजदर व मध्य पूर्वेत असलेल्या भूराजकीय अस्थिरतेच्या कारणास्तव गुंतवणूकदारांनी बाजारातून रक्कम काढली असल्याचे सांगितले जात आहे. ऑक्टोबरमध्ये गुंतवणूकदारांनी 24,548 कोटी रुपये काढले होते. सप्टेंबरमध्ये 14,767 कोटी रुपये काढल्याची माहिती आहे.