ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावे एका व्यावसायिकाला 3 कोटींची खंडणी मागणाऱ्या दोघांवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप पाटील, शेखर ताकवणे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. राजेश व्यास यांनी या संदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटील आणि ताकवणे यांनी ‘कॉल मीट’ नावाचे ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा नंबर सेव्ह केला. त्यानंतर समोरच्या व्यावसायिकाला फोन करुन हा मोहोळ यांचा नंबर असल्याचे भासवले. भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी 3 कोटी रुपये द्या म्हणून त्यांनी त्यांच्याकडे खंडणी मागितली. हा बनावट फोन कॉल असल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने तात्काळ कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेऊन यासंदर्भात तक्रार दिली. पोलिसांनी मोबाईल क्रमांकावरून शोध घेत आरोपींना ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरु आहे.
अधिक वाचा : ‘Dis’Qualified MP’; राहुल गांधींनी बदलला ट्विटर बायो