खेड / प्रतिनिधी
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 7 मार्च रोजी तीन होळी स्पेशल धावणार आहेत. वसईमार्गे धावणाऱ्या सुरत-करमाळी सुपरफास्ट होळी स्पेशलसह लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळूर वातानुकूलित स्पेशल, मडगाव-एलटीटी स्पेशल होळी स्पेशलचा समावेश आहे.
09193/09194 क्रमांकाची सुरत-करमाळी स्पेशल 7 रोजी सुरत येथून सायंकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 10.25 वाजता करमळी येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात 8 मार्च रोजी करमळी येथून सायंकाळी 4.20 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता सुरत येथे पोहचेल.
01165/0116 क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळूर स्पेशल 7 रोजी एलटीटीहून रात्री 10.15 वा. सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.20 वा. मंगळूर येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात 8 मार्च रोजी मंगळूर येथून सायंकाळी 6.45 वा. सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.45 वा. लो. टिळक टर्मिनस येथे पोहचेल. या स्पेशलला 22 एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत.
01592 क्रमांकाची 17 डब्यांची मडगाव-एलटीटी एकेरी स्पेशल 7 रोजी मडगाव येथून सकाळी 8.45 वाजता सुटून त्याचदिवशी रात्री 9.50 वा. एलटीटी येथे पोहचेल. 01158 क्रमांकाची रत्नागिरी-लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल 7 रोजी रत्नागिरी येथून सकाळी 6.30 वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता एलटीटीला पोहचेल.