Tarun Bharat

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात यावर्षी 3 लाख नोकऱया शक्य

टीमलिजने दिली माहिती ः आयटी-बीपीएम क्षेत्रात होणार भरती

वृत्तसंस्था/ बेंगळूर

माहिती तंत्रज्ञान (आयटी) व बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम)उद्योग यांच्याकडून यावर्षी 3 लाख जणांना नोकरीची संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे. या संयुक्त क्षेत्रात 51 लाख इतकी असणारी कर्मचारी संख्या यंदा 54 लाखावर पोहोचणार आहे. ही माहिती टीमलिज यांनी नुकतीच दिली आहे.

कोठे होणार भरती

आयटी उद्योगाचा विकास आर्थिक वर्ष 2023 मध्ये 7 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज टीमलिज या संस्थेने वर्तविला आहे. कंत्राट पद्धतीवर कर्मचारी घेण्याचे प्रमाण 21 टक्के वाढणार आहे. आयटी सेवा संस्था, जागतिक क्षमता केंद्रे त्याचप्रमाणे उत्पादन विकास कंपन्या आगामी काळामध्ये नव्या उमेदवारांची भरती करून घेणार आहेत. यासंदर्भातली तयारी पूर्ण करण्यात येत आहे. टीमलिज डिजिटलचे सीओओ सुनील चन्नाकोटील म्हणाले की, आयटीबीपीएम उद्योग येत्या काळामध्ये भारतासाठी भरती प्रक्रियेच्या कार्यात महत्त्वाचे योगदान देणार आहे. सुमारे 3 लाख जणांना याचवर्षी सामावून घेतले जाणार आहे. सुमारे 39 लाख जणांना नोकरीत सामावून घेणारा हा सर्वात मोठा खासगी क्षेत्रातला उद्योग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोणती शहरे आघाडीवर…

डिजिटल कौशल्याच्या क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणात उमेदवारांची गरज आगामी काळात लागणार आहे. तिरुवनंतपुरम, कोईमत्तूर, कोचिन, चंदिगड, अहमदाबाद, इंदोर, म्हैसूर, वडोदरा, जयपूर, मधुराई, विशाखापट्टणम, मंगळूर, लखनौ, गोवा, सालेम, नागपूर, दुर्गापूर, विजयवाडा आणि त्रिची या शहरामधील कंपन्यांचे भरती प्रक्रियेत योगदान अधिक राहिले आहे. या भागामध्ये आयटी क्षेत्रातल्या तज्ञांची संख्या जास्त आहे.

Related Stories

मार्स रिग्लेचे डार्क चॉकलेट आता भारतीय बाजारात

Patil_p

ऍमेझॉनने 1 लाख कोटी डॉलर्सचे बाजारमूल्य गमावले

Amit Kulkarni

इक्विटीतील गुंतवणूक दोन दिवसात 7 लाख कोटीवर

Patil_p

दरवर्षी स्टार्टअप्सच्या संख्येत 10 टक्के वाढ

Patil_p

2 हजारची नोट बंद? ; एटीएममध्ये बदल

tarunbharat

टीव्ही 18 ब्रॉडकास्टचा तिमाही नफा 77 टक्क्यांनी वाढला

Patil_p