Tarun Bharat

मध्यप्रदेशच्या बालाघाटमध्ये 3 नक्षलवाद्यांचा खात्मा

Advertisements

पोलिसांसोबत चकमक

वृत्तसंस्था/ बालाघाट

मध्यप्रदेशच्या कान्हा जंगलात नक्षलवाद्यांचा वावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वतःची सतर्कता वाढविली होती. काही नक्षलवादी विशिष्ट भागात पोहोचल्याची माहिती मिळताच राज्य पोलीस तसेच हॉक फोर्सने संयुक्तपणे बालाघाट जिल्हय़ातील कादला जंगलात शोधमोहीम हाती घेतली असता नक्षलवाद्यांसोबत त्यांची चकमक झाली. चकमकीदरम्यान पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले आहे. मृतांमध्ये एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. या मृत नक्षलवाद्यांकडून धोकादायक शस्त्रास्त्रs हस्तगत झाली आहेत.

बालाघाट पोलिसांना जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांचे पथक त्यांना पकडण्यासाठी तेथे पोहोचले होते. पोलिसांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला, प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलीस अद्याप या भागात मोहीम राबवत आहेत. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या चकमकीची पुष्टी दिली आहे.

हॉक फोर्सने चकमकीत नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य आणि 15 लाखांचे इनाम घोषित असलेला नक्षलवादी नागेश आणि 8 लाखांचे इनाम असलेला एरिया कमांडर नक्षलवादी मनोज आणि रामे यांना ठार केले असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली.  चकमक झालेला भाग हा महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे. मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्हय़ात अलिकडच्या काळात नक्षलवाद्यांचा वावर वाढला होता. छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील नक्षली म्होरके तेथे आश्रय घेऊ लागले होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काही दिवसांपूर्वी नक्षलवादाच्या समस्येचा आढावा घेतला होता. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या  भेटीदरम्यान बालाघाटमधील नक्षलवादी समस्येवर चर्चा केली होती.

Related Stories

जम्मू काश्मीरमधील कोरोना रुग्णांनी पार केला 75 हजारांचा आकडा

Tousif Mujawar

शक्तिकांत दास यांना तीन वर्षे मुदतवाढ

Patil_p

शंकरसिंग वाघेलांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

Patil_p

दिल्लीत दिवसभरात 956 नवे कोरोना रुग्ण; 14 मृत्यू

Tousif Mujawar

किरकोळ महगाई दरात जानेवारीत वाढ

Patil_p

आरोग्य मंत्रालयाने केरळ, हरियाणामधील बर्ड फ्लू बाधित जिल्ह्यांमध्ये तैनात केली पथके

Tousif Mujawar
error: Content is protected !!