Tarun Bharat

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला; तीन जवान शहीद, दोन अतिरेक्यांचा खात्मा

Advertisements

ऑनलाईन टीम /तरुण भारत

स्वातंत्र दिन अवघ्या काही दिवसांवर असताना जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील लष्कराच्या एका तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. (3 Soldiers Killed In Suicide Attack At Rajouri Army Base In Jammu And Kashmir 2 Terrorist Gunned Down)

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मोठ्या हल्लाचा कट रचला जात आहे. यामुळे काश्मीरमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरु आहे. अशात काल जम्मू काश्मारीच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात भारतीय लष्कराच्या तीन जवावांना वीरमरण आले, तर दोन दहशतवादी ठार करण्यात यश आलं आहे.

राजौरीपासून २५ किती अंतरावरील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न केला. या आत्मघाती हल्ल्याच्या कटात दोन दहशतवादी सामील झाले होते. अशी माहिती भारतीय सुरक्षा दलाने दिली आहे. अद्यापही दहशतवाद्यांविरोधात लष्कराची कारवाई सुरू आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राजौरीच्या दरहाल भागात काल रात्री उशिरा दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या एका कँपवर हल्ला केला. त्यावेळी दहशतवाद्यांकडून लष्करावर जोरदार गोळीबार करण्यात आला दोन्ही बाजूंनी बराच गोळीबार सुरु होता. अखेर भारतीय लष्कराने प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, यात तीन भारतीय जवान शहीद झाले.

दरम्यान, या घटनेनंतर सहा किलोमीटरच्या क्षेत्रात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. जखमी जवानांवर लष्कराच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. १६ कोर्प्सचे लेफ्टनंट कमांडर जनरल मनजिंदर सिंग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Related Stories

कोरोना फैलाव : WHO चा भारताला गंभीर इशारा

Sumit Tambekar

आता होणार ४ वर्षांसाठी सैन्य भरती

Abhijeet Khandekar

अमरिंदर – सिद्धू एकत्र काम करणार

Amit Kulkarni

दोनवेळच्या खासदार झेडपी निवडणुकीत पराभूत

Patil_p

गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Abhijeet Shinde

चरणजीत सिंग चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

datta jadhav
error: Content is protected !!