Tarun Bharat

30 लाखाचे दागिने व रोकड जप्त

Advertisements

भुईंज पोलिसांची कामगिरी- सोन्याचांदीच्या दागिन्यांची अवैधरित्या वाहतुकीचा पर्दाफाश

प्रतिनिधी/ सातारा

आनेवाडी टोलनाक्यावर सना ट्रव्हल्समधून सोन्याचांदीचे दागिने व रोकड याची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी एका परप्रांतियास भुईंज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातील 29 लाख 62 हजार 716 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने कोल्हापूरच्या सराफ बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. राजवीर हनमंत तोमर (रा. शिवाजी चौक कोल्हापूर मुळ रा. सोहनर ता. नडवाल जि. शिवपूरी राज्य मध्यप्रदेश) असे याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.   

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 1 एप्रिल रोजी भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांना कोल्हापूर ते पुणे जाणाऱया सना ट्रव्हलच्या बसमधून अवैधरित्या सोने व चांदीच्या दागिन्यांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती होती. कांबळे यांनी मग भुईंज पोलीस ठाण्याच्या टीमसह रात्रीपासून आनेवाडी नाक्यावर पुणे बाजूकडे जाणाऱया लेनवर नाकाबंदी करत गाडय़ांची तपासणी सुरु केली होती.

पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास या तपास पथकाच्या टप्प्यात त्यांना हवी असलेली सना ट्रव्हल कंपनीची बस क्रमांक एम. एच. 09 सीव्ही 3299 आली. पथकाने ही बस थांबवली. ट्रव्हल्समधून अवैधरित्या सोन्या, चांदीची वाहतूक होत असल्याने ही बस थांबवण्यात आली असल्याचे त्यांनी बसचे चालक, क्लिनर व बसमधील प्रवाशांना सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी क्लिनरला बसची डिकी खोलण्यास सांगितले.

या डिकीमध्ये पथकाकडून तपासणी सुरु असताना डिकीत दोन पांढऱया पॉलीथॉनच्या गोण्या मिळून आल्या. या गोण्या कोणात्या प्रवाशाच्या आहेत याबाबत  चालक व क्लिनरकडे विचारपूस केली असता या गोण्या त्यांनी प्रवाशी राजवीर हनमंत तोमर याच्या असल्याचे सांगितले. तपास पथकाने तोमरकडे चौकशी करता तो प्रथमदर्शनी उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. मात्र, नंतर त्याने या दोन्ही गोण्यामध्ये सोन्या, चांदीचे दागिने (माल) असल्याचे कबूल केले. तसेच त्याच्याकडे असलेल्या सॅक बॅगमध्ये सुध्दा सोन्या चांदीचे दागिने  असल्याचे सांगितले. या दागिन्यांबद्दल त्याच्याकडे पावती बाबत विचारणा केली असता त्याने त्याच्याकडे या दागिन्यांच्या मालकी हक्का बाबत कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले.

त्यामुळे हा सर्व माल हा चोरीचा असल्याचा वाजवी संशय निर्माण झाल्याने तपास पथकाने तोमर याला ताब्यात घेवून त्यास मुद्देमालासह पोलीस ठाण्यात नेले. तिथे या गोण्यांची तपासणी केली असता 13 लाख 72 हजार 408 रुपये किंमतीचे सुमारे 34 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मंगळसूत्र, नेकलेस, ठुशी तसेच

14 लाख 31 हजार 718 रुपये किंमतीचे 55 किलो 671 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजन, वाळे, देवांच्या मुर्ती, समई, ताम्हण आणि 1 लाख 58 हजार 590 रुपयांची रोकड असा एकूण 29 लाख 62 हजार 716 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

मुद्देमाल जप्त करुन न्यायालयात जमा

सोन्याचांदीचे अवैधरितत्या वाहतूक करताना पकडण्यात आलेला मुद्देमाल अधिकृत लासन्सधारक सोनार व दोन सरकारी पंच यांचेसमक्ष सी.आर.पी.सी. 102 प्रमाणे जप्त केला. त्याबाबतचा सविस्तर अहवाल वाईचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  यांना सादर करण्यात आला असून त्याचप्रमाणे पुढील कार्यवाहीसाठी सातारच्या जी.एस.टी. कार्यालय यांनाही कळवण्यात आले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी सांगितले.  

एपीआय कांबळेंसह पथकाचे अभिनंदन

रात्रभर जागे सर्तक राहून ही कारवाई केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे तसेच कारवाई पथकातील उपनिरीक्षक निवास मोरे, रत्नदिप भंडारे, पोलीस कर्मचारी विकास गंगावणे, बापूराव थायगुडे, अतुल आवळे, दुदुस्कर, गायकवाड, कदम, वर्णेकर यांचे पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे यांनी अभिनंदन केले.

Related Stories

शेतकरी कन्येची आसाम रायफलमध्ये निवड

datta jadhav

24 तासात 9 दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

सातारा : मास्क न लावणाऱ्यावर शहरात कडक कारवाई

Abhijeet Shinde

कोल्हापूरच्या जवानाच्या कुटुंबाला माजलगावकडून ४ लाख ५२ हजाराची मदत

Abhijeet Shinde

जिल्ह्यात दुपारी बारा पर्यंत १७ पॉझिटिव्ह तर १ मृत्यू

Abhijeet Shinde

सातारा जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!