ऑनलाईन टीम / गुजरात :
गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि भारतीय तटरक्षक दलाला एक मोठी सफलता मिळाली आहे. दोघांनी संयुक्त अभियानद्वारे कारवाई करत भारतीय सागरी सीमेवर एक बोट पकडली आहे. त्यामध्ये 8 पाकिस्तानी होते. एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने 8 पाकिस्तानी नागरिकांकडून 30 किलो हेरॉईन जप्त केले आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही बोट कच्छ जिल्ह्यातील जाखू बीचजवळ पकडण्यात आली आहे. आयजीटीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एटीएस गुजरातबरोबर संयुक्त कारवाईत आयजीसीने भारतीय समुद्र क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय मेरीटाइम बॉर्डर लाईनजवळ पाकिस्तानी नौका पीएफबी ( पाकिस्तानी मासेमारी बोट ) पकडली. या बोटीमधील 8 पाकिस्तानी आणि 30 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.