गर्लगुंजी-राजहंसगड रस्त्यावर अपघात
प्रतिनिधी /खानापूर
गर्लगुंजी-राजहंसगड रस्त्यावर प्रवाशी टेम्पो उलटून 30 जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता टेम्पो पलटी झाल्याने हा अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली.
याबाबत समजलेली माहिती अशी, बेळगाव ता. हुदली येथील प्रवीण कमार यांच्या लग्नाच्या बोलणीसाठी गर्लगुंजी येथे केए 22 सी 0299 या प्रवाशी टेम्पोने जात होते. गर्लगुंजी-राजहंसगड रस्त्यावर टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाने टेम्पो थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र, टेम्पो दोन वेळा पलटी झाला. या अपघातात टेम्पोमधील 30 प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती गर्लगुंजी येथे समजताच ग्रामपंचायत अध्यक्ष हणमंत मेलगे, सदस्य प्रसाद पाटील, गोपाळ पाटील, कल्लाप्पा लोहार, बंडू कुंभार यासह अन्य सहकाऱयांनी अपघात ठिकाणी धाव घेतली. जखमींना तातडीने टेम्पोतून बाहेर काढून 108 रुग्णवाहिकेतून तसेच दोन क्रूझरमधून येळ्ळूर केएलई हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीन उपचार सुरू केले. जखमीतील एकाची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्याला बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. इतर सर्व जखमींची प्रकृती धोक्मयाबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या अपघातात एकूण 30 जण जखमी झाले असून 12 महिला आणि दहा पुरुष व दहा मुले असा 30 जणांचा समावेश आहे. सर्वजण धोक्मयाबाहेर असून काही जणांना प्राथमिक उपचार करून डिस्चार्ज देण्यात आले आहे. तर काहींजणांवर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली आहे. घटनास्थळी खानापूर पोलिसांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे.