वर्ष 2026 पर्यंत ध्येय प्राप्त करणार असल्याचे मंत्री चंद्रशेखर यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत हा आगामी काळात म्हणजे येत्या 2026 पर्यंत जवळपास 300 अब्ज डॉलर्सच्या उलाढालीचे उत्पादन घेणार आहे. यामध्ये 70 ते 80 अब्ज डॉलर्सचा वाटा एकटय़ा सेमीकंडक्टर उत्पादनात राहणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली आहे.
येत्या काळात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उत्पादन वाढवत जाणार आहे. यातून 2026 पर्यंत देशात तुटवडा असणाऱया सेमीकंडक्टरची समस्या सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे तर दुसरीकडे 120 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे ध्येय निश्चित करणार असल्याचा दावा यावेळी मंत्र्यांनी केला आहे.
बेंगळूर येथील कार्यक्रमात पाच कंपन्यांच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक चिप आणि डिस्प्लेची उत्पादने घेणाऱया प्रकल्पांची स्थापना होणार असून त्याकरीता 1.53 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ग्राहय़ धरली जात आहे. या कार्यक्रमाअंतर्गत 76,000 कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज मिळणार असल्याचे संकेत आहेत.
बेंगळूर येथे सेमीकॉन इंडिया 2022 चे आयोजन
29 एप्रिल ते 1 मे दरम्यान सरकारकडून सेमीकॉन इंडिया 2022 चे आयोजन बेंगळूर येथे करण्यात येणार आहे. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमितेष सिन्हा यांनी सांगितले, की या कार्यक्रमाचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल माध्यमाद्वारे करणार आहेत.
चीनमधील सेमीकंडक्टरचे उत्पादन घटले
चीनमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या प्रभावामुळे आर्थिक राजधानी असणाऱया शांघायमध्ये सलगच्या लॉकडाऊनमुळे व अन्य अडचणींमुळे सेमीकंडक्टरचे उत्पादन घटले आहे. चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत चीनमध्ये इंडीग्रेटेड सर्किटचे उत्पादन 4.2 टक्क्यांनी घसरले आहे.