Tarun Bharat

पुण्यात गुंतवणुकीच्या आमिषाने 300 कोटींची फसवणूक

पुणे / वार्ताहर :

एका इन्व्हेस्टमेंट कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल 200 कर्जदारांची 300 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे.

याप्रकरणी आरोपी सेलवाकमार नडार (रा.कोंढवा खुर्द ,पुणे )व इतर आरोपींवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत सचिन पुरुषोत्तम पवार (रा. वाघोली ,पुणे )यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2020 ते नोव्हेंबर 2022 यादरम्यान कॅम्प परिसरातील न्यूक्लियस मॉलमधील अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट याठिकाणी घडलेला आहे. याबाबत पोलिसांनी आरोपीवर आर्थिक फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदरांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 चे कलम तीन नुसार गुन्हा दाखल केलेला आहे.

अधिक वाचा : कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक 6 तास बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे मालक सेलवाकमार नडार व कार्यालयीन कर्मचारी यांनी त्यांच्याकडील गुंतवणूक स्कीमबाबत ठेवीदारांना माहिती देऊन, गुंतवणूक केल्यास चांगला नफा अल्पावधीत मिळण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार तक्रारदार यांचा विश्वास संपादन करुन तक्रारदाराच्या नावे पर्सनल लोन करुन घेऊन तक्रारदारचे खात्यावर जमा झालेली एकूण रक्कम 40 लाख 89 हजार 152 रुपये त्यांच्या अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवी स्वरुपात गुंतवणूक केली. त्यानंतर त्यानंतर वेळोवेळी पैसे काढत एकूण सात कोटी 58 लाख 95 हजार 845 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच तक्रारदार यांच्या सारख्या 200 कर्जदारांची सुमारे अंदाजे 300 कोटी रुपये एवढी फसवणूक केली आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस वैरागकर पुढील तपास करत आहेत.

Related Stories

“शिवसेना, सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करतो म्हणून माझं निलंबन”

Archana Banage

राष्ट्रवादीची भाजपसोबत युती…? नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा नविन प्रयोग

Abhijeet Khandekar

‘महाराष्ट्रात सत्तेचे भोगी’ वक्तव्यावर राऊतांची राज ठाकरेंवर टीका; म्हणाले, “कुणाला पीएचडी…”

Archana Banage

पीएम मोदींच्या सीएम ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, म्हणाले..

Archana Banage

कोल्हापूर : अल्पवयीन युवतीवरील अत्याचार प्रकरणी एकास तीन वर्षे सक्तमजुरी

Archana Banage

अधिकाऱ्यांच्या भरवश्यावर राज्य चालवणे चिंताजनक-सतेज पाटील

Rahul Gadkar