इलेक्ट्रिक स्पोर्ट दुचाकी एफ77 सादर ः 152 किमी टॉप स्पीड मिळणार असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बंगलोर स्थित स्टार्टअप अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्हने नवीन इलेक्ट्रिक स्पोर्ट बाइक एफ77 लाँच केली आहे. बाईकचे टॉप स्पीड 152 किलोमीटर प्रति तास (केएमपीएच) आहे आणि एका चार्जवर ती 307 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 3.80 लाख रुपये आहे. हे 3 मॉडेल एफ77 स्टॅण्डर्ड, एफ77 रेकॉन व एफ77 स्पेशलमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहक 10,000 रुपयांमध्ये अल्ट्राव्हायोलेट एफ77 बुक करू शकतात.
राइडिंग मोड
कंपनीच्या मते, एफ77 चे स्टँडर्ड आणि रिकॉन दोन्ही प्रकार 38.8 बीएचपी पॉवर आणि 95 एनएम टॉर्क जनरेट करतात. टॉप स्पीड 147 किमी प्रतितास आहे आणि ग्लाइड, कॉम्बॅट आणि ब्लास्टिक यासह तीन रायडिंग मोडसह येतात.
कंपनी जानेवारी 2023 पासून बेंगळूरमध्ये या गाडीची डिलिव्हरी सुरू करणार आहे. तर अन्य शहरांमध्ये ती हळूहळू सुरू होईल. या बाईकची (अल्ट्राव्हायलेट एफ77) जागतिक मागणी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. बाईकचे बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइट https://www.ultraviolette.com वर 25 नोव्हेंबर पासून करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अन्य फिचर्स
w दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक
w 5-इंचाचा स्मार्ट टीएफटी डिस्प्लेवर वेग, बॅटरीची स्थितीची माहिती
w एलईडी हेडलाइट्स, टेललॅम्प आणि डेटाइम रनिंग लाइट्स उपलब्ध
w 1 तासात 65 किलोमीटर पर्यंत चार्जिंग रेंज
w जानेवारी 2023 पासून वितरण सुरू होणार होईल