Tarun Bharat

31 रुग्णवाहिकांचे लोकार्पण

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा परिषदेने 14 व्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या 31 रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

येथील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या प्रांगणात  झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री बाळसाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, कृषी सभापती मंगेश धुमाळ आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणार दिलासा

– पालकमंत्री बाळासाहेब पाटील

जिह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळावी ही मागणी अनेक वर्षांची होती. शासनाच्या सहकार्याने जिह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 31 रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. यामुळे रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळणार असून या रुग्णवाहिकांमुळे निश्चित ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Related Stories

दांडके डोक्यात घालून कामगाराचा खून

Patil_p

सैदापूरमध्ये तीन चिमुरडय़ा बहिणींचा मृत्यू

Patil_p

वराडे येथे वन्यजीव उपचार केंद्र मंजूर

Patil_p

शहरात लक्ष्मी टेकडी झोपडपट्टीमध्ये कोरोना टेस्टवरून रोष

Patil_p

लाँकडाऊन मुळे रखडलेल्या कामांना मिळणार गती

Patil_p

आदर्श हायस्कूल भामटेच्या मच्छिंद्र कुंभार यांना २०२० चा ग्लोबल टिचर पुरस्कार

Archana Banage