वार्ताहर / वेंगुर्ले:
31 डिसेंबरच्या रात्री किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धुम्रपान करणे, पाटर्य़ा करणे, फटाके फोडणे आदी गैरप्रकार होतात. पोलिसांनी या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नियोजन करून सुसंस्कृत आणि नितीमान समाज घडविण्यास सहकार्य करावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने मंगळवारी वेंगुर्ले पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी महेश जुवलेकर, चंद्रकांत ठाकुर, गोपाळ जुवलेकर, योगिता जुवलेकर, दाजी नाईक, प्रवीण कांदळकर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, 31 डिसेंबरच्या रात्री मोठय़ा प्रमाणात धुम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन केले जाते. तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालविल्यामुळे अपघातही होत आहेत. तरी कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी आपण योग्य ती कारवाई करावी.