Tarun Bharat

पोरस्कडे येथे बेकायदा रेती प्रकरणी 31 होडय़ा जप्त

कप्तान ऑफ पोर्टची सलग दुसऱयांदा कारवाई : मामलेदार, पोलिसांकडून चार रेतीवाहू ट्रक जप्त

प्रतिनिधी /पेडणे

 पोरस्कडे येथे बेकायदा रेती व्यवसाय प्रकरणी कॅप्टन ऑफ पोर्ट आणि पेडणे पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत 31 होडय़ा जप्त केल्या. ही कारवाई शुक्रवारी 29 रोजी करण्यात आली. चार दिवसांपूर्वीच कॅप्टन ऑफ पोर्ट आणि पेडणे पोलिसांनी नईबाग पोरास्कडे पुलाखाली कारवाई करून एकूण 26 होडय़ा जप्त केल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी दुसऱयांदा कारवाई करण्यात आली.

  दरम्यान, तेरेखोल आणि शापोरा नदीत सध्या बेकायदा रेती व्यवसाय सुरू नसल्याचा दावा कॅप्टन ऑफ पोर्टचे अधिकारी शिरससईकर यांनी केला. सहकारी कर्मचाऱयासोबत दोन्ही नद्यांमध्ये खात्याच्या बोटीमधून फेरफटका मारून पाहणी केली असता बेकायदा रेती व्यवसाय आढळून आलेला नाही. शुक्रवारी केलेल्या कारवाईत ज्या 31 होडय़ा जप्त केल्या आहेत, त्या होडय़ांचे परवाने किंवा कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत की नाही याबाबत तपासणी करण्यासाठी हा छापा मारल्याचे शिरसईकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अन्य एका कारवाईत पेडणे मामलेदार आणि पेडणे पोलिसांनी बेकायदा रेती वाहतूक करणारे चार ट्रक शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतल्याची माहिती मामलेदार अनंत मळीक यांनी दिली.

 माळरानावर मोठय़ा प्रमाणात रेतीचा साठा

पावासाळय़ात रेतीला मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याने आणि किनाऱयावर ठेवलेल्या बेकायदा रेतीचे साठय़ांवर सरकारी यंत्रणा कारवाई करेल, याचा धसका घेत संबंधित रेती व्यावसायिकांनी शेतात आणि माळ रानात साठवून ठेवल्याचे स्पष्ट होत आहे.

Related Stories

दाबोळीतील आसय डोंगरी भागातील लोकांचे पाण्यावीना हाल

Amit Kulkarni

‘सीआरझेड’मध्ये सरकारी, खासगी बांधकामे

Omkar B

युवा काँग्रेसतर्फे बिल्डकाँम कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा

Patil_p

कला निकेतन सांस्कृतिक मंडळाचे पुरस्कार जाहीर

Amit Kulkarni

फोंडय़ातील नायर यांच्या दुकानात चोरी

Patil_p

सांखळी राधाकृष्ण देवस्थानच्या मंदिर परिसरात सुशोभीकरण

Amit Kulkarni