Tarun Bharat

बिहारमध्ये 31 मंत्र्यांनी घेतली शपथ

Advertisements

मुख्यमंत्र्यांकडे गृहसमवेत 5 खाती ः तेजस्वी यांना आरोग्य, नगरविकास खाते

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारमध्ये नितीश कुमार मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार झाला तसेच खातेवाटपही पार पडले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वतःकडे गृह, सामान्य प्रशासनासह 5 खाती ठेवली आहेत. तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे आरोग्य, रस्तेनिर्मिती, नगरविकास तसेच ग्रामीण कार्य विभागांची जबाबदारी आहे. लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यांना पर्यावरण, वन तसेच हवामान बदल खाते देण्यात आले आहे.

राजभवनात राज्यपाल फागू चौहान यांनी 31 मंत्र्यांना शपथ दिली आहे. या मंत्र्यांमध्ये राजदचे सर्वाधिक 16, संजदचे 11 तर काँग्रेसचे 2 आणि ‘हम’चा एक तर एक अपक्ष आमदार सामील आहे. महाआघाडीच्या नव्या सरकारमध्ये सामाजिक समीकरणे विचारात घेत मंत्री नियुक्त करण्यात आले आहेत.

ओबीसी-ईबीसीचे सर्वाधिक 17, दलित 5 आणि 5 मुस्लीम आमदारांना मंत्रिपद मिळाले आहे. तर सवर्ण जातींचे प्रतिनिधित्व घटले आहे. मागील सरकारमध्ये सवर्ण जातींचे 11 मंत्री होते. आता ही संख्या कमी होत 6 झाली आहे. जातनिहाय चित्र पाहिल्यास सर्वाधिक यादव समुदायाच्या 8 आमदारांना मंत्रिमंडळात सामील करण्यात आले आहे. राजदकडून 7 आणि संजदकडून एक यादव आमदार मंत्री झाला आहे.

संजद अन् राजदमध्ये नाराजी

मंत्रिमंडळ विस्तारानंतर संजद आणि राजदमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. संजदमध्ये उपेंद्र कुशवाह तर राजदमध्ये भाई वीरेंद्र नाराज आहेत. दोघांनाही मंत्रिपदाची अपेक्षा फोल ठरली आहे. उपेंद्र कुशवाह नाराज होत दिल्लीत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Stories

पंजाब काँगेसमध्ये सिद्धूंना वाढता विरोध

Patil_p

लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित

datta jadhav

”मराठा समाजाला केंद्राने आरक्षण मिळवून द्यावे”

Abhijeet Shinde

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना मातृशोक

datta jadhav

”पंतप्रधान मोदींसह त्यांच्या साथीदारांनी हजारो किलोमीटर भूप्रदेश चीनला दिला”

Abhijeet Shinde

कोविड काळात वाढत्या बेरोजगारीने देशातील चोऱ्यांमध्ये वाढ

datta jadhav
error: Content is protected !!