वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2022 च्या हॉकी हंगामामध्ये विविध प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणाऱया भारताच्या वरिष्ठ पुरूष हॉकी संघातील 33 संभाव्य हॉकीपटूंची घोषणा मंगळवारी येथे हॉकी इंडियाने केली आहे. या नव्या वर्षांच्या हॉकी हंगामाला फेब्रुवारीमध्ये हॉकी प्रो लीग स्पर्धेने प्रारंभ होणार आहे.
अलिकडेच बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये 60 हॉकीपटूंसाठी तीन आठवडय़ांचे सराव शिबीर आयोजित केले होते. या शिबिरातील आता 33 हॉकीपटूंची हॉकी इंडियाने निवड केली आहे. 33 हॉकीपटूंच्या कोर गटामध्ये कर्णधार मनप्रित सिंग, पी.आर. श्रीजेश, हरमनप्रित सिंग, सुरिंदरकुमार, मनदीप सिंग, ललितकुमार उपाध्याय, जुगराज सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग, एम. रविचंद सिंग, गोलरक्षक पाठक, सुरज करकेरा, जर्मनप्रित सिंग, निलम संजीप झेस, डी. तिर्की, वरूणकुमार, अमीत रोहीदास, मनदीप मोर, संजय, हार्दिक सिंग, सुमीत, नीलकांता शर्मा, समशेर सिंग, राजकुमार पाल, जसकरन सिंग, विवेक सागर प्रसाद, आशीषकुमार टोपनो, दिलप्रित सिंग, गुरजंत सिंग, आकाशदीप सिंग, गुरूसाहीबजीत सिंग, शिलानंद लाक्रा, अभिषेक, सुखजीत सिंग, मोहम्मद मौसीन.