हुल्याळ क्रॉसनजीक चेकपोस्टवर कारवाई : दोन ट्रकसह तिघांना अटक
वार्ताहर /जमखंडी
जमखंडीतील हुल्याळ क्रॉसमधील चेकपोस्टवर 33 टन तांदूळ अधिकाऱ्यांनी जप्त केला. इलकलहून अथणी तालुक्मयातील कोलूर येथील कारखान्याला तांदूळ पुरवठा करण्यात येत असल्याचे समजते. या 33 टन तांदळाची किंमत 4 लाख 96 हजार ऊपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी तांदळासह दोन्ही ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांदळाची पोती दोन ट्रकमधून वाहतूक करण्यात येत असताना चेकपोस्टवर ट्रक अडवून तपासणी करण्यात आली. यावेळी ट्रकमध्ये 50 किलो वजनाची 653 तांदळाची पोती आढळली. हा तांदूळ रेशनचा असल्याचे आढळून आल्याने जप्त करण्यात आला. याप्रकरणी बसवराज मुत्तप्पा वज्रमट्टी (वय 33, रा. कोलार, जि. विजापूर), डोंगरीबादशहा हसनसाब शेख (वय 29, रा. सुनदाळ, ता. रामदुर्ग), गोविंद हुरकडली व अन्वर सिकंदर (दोघे रा. बागलकोट) यांच्याविऊद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ट्रक (केए 28 डी 7333) व (केए 29 सी 2171) पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.