वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
देशातील निर्यात मार्च महिन्यात 34.57 टक्क्मयांनी घसरुन 21.41 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचली आहे. याबाबतची माहिती नुकतीच वाणिज्य मंत्रालयाकडून सादर केलेल्या आकडेवारीतून सांगण्यात आली आहे. यात उपलब्ध आकडेवारी 2019-20 च्या दरम्यान देशातील 4.78 टक्क्मयांनी घसरुन 314.31 अब्ज डॉलरवर पोहोचली होती.
चालू महिन्यातील व्यापारी तोटा वर्षभर अगोदर 11 अब्ज डॉलर्सने कमी होत 9.76 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2019-20 या कालावधीत व्यापारी तोटा 2018-19 च्या तुलनेत 184 अब्ज डॉलरने कमी होत 152.88 अब्ज डॉलरच्या घरात गेल्याचे म्हटले आहे.