माउंट एव्हरेस्ट करणाऱयांसाठी विशेष अड्डा
पबमध्ये केवळ हार्ड ड्रिंक्स मिळतात, पण जगातील सर्वाधिक उंचीवर स्थित पब असण्याचा मान नेपाळमधील आयरिश पबने मिळविला आहे. भारताला लागून असलेल्या नेपाळमध्ये नामचे नावाचा एक छोटा भाग आहे. हे ठिकाण स्वतःच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी जाणाऱया लोकांना वाटेत हा भाग लागतो. तेथे एक आयरिश पब असून तो जगातील सर्वाधिक उंचीवर असणारा आयरिश पब आहे.
समुद्रसपाटीपासून हा पब 3,450 मीटर म्हणजेच 3 किलोमीटरपेक्षाही अधिक उंचीवर आहे. अंतर्गत सौंदर्यासह याचे वैशिष्टय़ म्हणजे तेथे माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी जाणाऱया लोकांचा गोतावळा जमा होतो आणि तेथे ते मौजमजा करताना दिसून येतात.
जगभरातून येतात लोक
कोरोना महामारीमुळे पब मागील वर्षी एप्रिलमध्ये बंद झाला होता, परंतु आता तो पुन्हा खुला करण्यात आला आहे. काठमांडूपासून लुकला भागापर्यंत या पबशी संबंधित सामग्रीचा पुरवठा विमानाद्वारे केला जातो. त्यानंतर पोर्टर सामग्री पाठीवर घेत पबपर्यंत पोहोचतात. पबमध्ये जगाच्या कानाकोपऱयातील लोक भेटतात, त्यांचे अनुभव जाणून घेतल्यावर थक्क व्हायला होते. लोक तेथे तुम्हाला गिर्यारोहणाशी संबंधित गोष्टी सांगताना दिसून येतील, तर अनेक जण केवळ प्रवास करण्याच्या उद्देशाने तेथे आल्याचे आढळून येईल.
भूकंपामुळे झाले होते नुकसान
2015 मधील तीव्र भूकंपामुळे या पबचे मोठे नुकसान झाले होते. पण हळूहळू या नुकसानातून बाहेर असताना महामारीमुळे हा पब पुन्हा बंद करावा लागला होता. एव्हरेस्ट बेस कॅम्पचा हिस्सा होणारे अनेक लोक पबमध्ये येतात. या पबसोबत तुम्हाला नामचेमधील सुंदर दऱया दिसून येतील.