Tarun Bharat

35 मोबाईल चोरणारा अल्पवयीन चोरटा जेरबंद

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

शहर व परिसरात गेल्या काही दिवसात मोबाईल चोरटय़ाने धुमाकूळ घातला आहे. त्याबाबत या चोरटय़ांचा शोध घेण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी केलेल्या कारवाईत तब्बल 35 ठिकाणी मोबाईल चोरी करणारा सराईत अल्पवयीन चोरटा जेरबंद केला असून त्याच्याकडून 1 लाख 75 हजार 500 रुपयांचे विविध कंपन्यांचे 15 चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत. दरम्यान, ज्या नागरिकांचे मोबाईल चोरी झालेले आहेत त्यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सातारा शहरामध्ये दररोज मोबाईल चोरीचे गुन्हे घडत असल्याने या चोरटय़ांनी आव्हान निर्माण केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील त्या अनुषंगाने तपास करत असताना त्यांना शहरानजिक असलेल्या वनवासवाडीत डॉ. आंबेडकर भवन येथे मोबाईल चोरी करणारा सराईत विधीसंघर्ष बालक हा चोरलेले मोबाईल विक्रीसाठी घेवून येत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे व त्यांच्या पथकातील कर्मचाऱयांनी वनवासवाडी भागात डॉ. आंबेडकर भवन येथे सापळा रचला. त्यावेळी सदरचा सराईत अल्पवयीन बालक हा हातात  प्लास्टिकच्या पिशवीत चोरीचे मोबाईल घेवून आला असताना त्याला जागीच ताब्यात घेतले.

यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने शिवराज पेट्रोल पंप, मयुरेश पार्क, सदरबझार, रामलक्ष्मी सोसायटी कृष्णानगर, निशिगंधा कॉलनी, समर्थनगर कोडोली, त्रिमुर्ती कॉलनी, गोडोली नगरपरिषद कॉलनी, सदरबझार, पालवी चौक गोडोली नाका, मातंगवस्ती कोडोली, चाहुर, मल्हार पेठ, महिंद्रा शोरुमशेजारी  हायवेवर ट्रकमधून व शहर व तालुका परिसरात आतापर्यंत 35 मोबाईलची चोरी केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये सातारा शहर पोलीस स्टेशनला दाखल असलेले चोरीचे गुन्हे उघड केले आहेत.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहाय्यक फौजदार जोतीराम बर्गे, हवालदार सुधीर बनकर, विनोद गायकवाड, मोहन नाचण, संतोष जाधव, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, गणेश कापरे, धीरज महाडिक, वैभव सावंत, मोहसीन मोमीन, संजय जाधव, गणेश कचरे यांनी सहभाग घेतला होता.

Related Stories

वरुणराजाच्या साक्षीने बाप्पांना निरोप

Patil_p

रुग्णालयाच्या दारातच बाधिताने सोडला जीव

Patil_p

सातारा : काही दिवसापूर्वीच ‘ते’ झाले क्वारंटाइन, चोरट्यांच्या तिजोरीवर डल्ला

Abhijeet Shinde

संघ कधीही सत्ताकारणात येणार नाही; मोहन भागवतांनी स्पष्टचं सांगितलं

Abhijeet Khandekar

सातारा : ‘मिसेस मुख्यमंत्री’ चे चित्रीकरण सुरू

Abhijeet Shinde

एसटी सेनेच्या पाठपुराव्याला यश

Patil_p
error: Content is protected !!