नवी दिल्ली
कच्चे तेल आयात करताना भारत सऊदी अरबमधूनही तेल आयात करतो. यंदा या कच्च्या तेलाच्या आयातीसाठी खरेदीत 35 टक्के कपात करणार असयाचे सांगितले जात आहे. भारतीय रिफायनरी कंपन्या सऊदी अरबमधून आगामी काळात कच्चे तेल कमी प्रमाणात आयात करणार आहेत. कोरोनाच्या रुग्णसंख्येने पुन्हा उसळी घेतली असल्याने इंधन मागणी कमी झाली आहे. कच्चे तेल आयातीसाठी खरेदी करताना म्हणूनच सऊदी अरबमधले प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसह अन्य तीन रिफायनरी कंपन्यांनी मे महिन्यात कमी कच्च्या तेलाची आयात करण्याचे ठरवले आहे.