देणगीमधून साकारणार संशोधक विद्यार्थ्यांनींचे वसतिगृह
कोल्हापूर प्रतिनिधी
अत्यंत सुदृढावस्थेत जन्मलेली बालिका अचानक ताप आल्याने वयाच्या तिसऱया-चौथ्या वर्षी विकलांग, इंद्रियशिथिल बनते. आई-बापाचा तिला पूर्ववत करण्याचा संघर्ष सुरू होतो. एक दिवस हे मूल आता बरे होऊ शकणार नाही, ही वस्तुस्थिती समोर आली. रजनी व पंडीत मारूलकर या दांपत्याच्या या मुलीने वयाच्या 45 व्या वर्षी ती मुलगी अखेरचा श्वास घेतला. आपल्या माघारी तिच्या आयुष्याची तरतूद म्हणून मारूलकर दांपत्याने 35 लाख रुपयांची बचत केली होती. आता ही 35 लाख रुपयांची रक्कम तिच्या स्मरणार्थ शिवाजी विद्यापीठाला त्यांनी प्रदान केली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्याकडे धनादेश सुपुर्द केला. या निधीमधून विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थिनींसाठी वसतीगृह साकारले जाणार आहे.
मारूलकर हे 1968 ते 1999 या कालावधीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या सेवेत होते. सहाय्यक कुलसचिव पदावरून ते सेवानिवृत्त झाले. त्यांची कन्या अस्मिता तीन वर्षांची असताना तापाचे निमित्त होऊन अंथरूणाला खिळली. तिच्या शरीराचे नियंत्रण करणारे मेंदूतील केंद्र निकामी झाले. केवळ दृष्टी, श्रवण आणि बुद्धीमत्ता एवढेच कायम राहिले. 19 डिसेंबर 2020 रोजी वयाच्या 45J³ee वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. आपल्या माघारी तिची हेळसांड होऊ नये, यासाठी या दांपत्याने पै न पै साठवून 35 लाख रुपयांची बचत केली. हे पैसे विद्यापीठाला देणगी स्वरूपात देवून एक वेगळा आदर्श निर्माण केला. मारुलकर म्हणाले, हा निधी अस्मिताचा आहे. तो केवळ तिच्या वतीने आम्ही विद्यापीठास सुपूर्द करीत आहोत. त्याचा विद्यापीठाने योग्य कारणास्तव विनियोग करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव
संशोधक विद्यार्थीनींसाठी वसतिगृह उभारणार
मारुलकर कुटुंबियांनी ज्या भावनेतून हा निधी विद्यापीठास प्रदान केला, तिचा आदर राखून विद्यापीठातील संशोधक विद्यार्थिनींसाठी प्रस्तावित असलेल्या वसतीगृहाच्या बांधकामासाठी या निधीचा विनियोग केला जाईल. त्याचप्रमाणे वसतीगृहाच्या प्रथम मजल्यावर ‘सौ रजनी पंडीत मारूलकर आणि पंडीत मारूलकर यांनी कन्या अस्मिता हिच्या स्मृतीप्रित्यर्थ दिलेल्या देणगीतून या मजल्याचे बांधकाम झाले’ अशी कोनशिला दर्शनी भागात बसविण्यात येईल, असेही सांगितले. मारुलकर दांपत्याने या देणगीद्वारे दातृत्वाचे एक महान उदाहरण जगासमोर ठेवले आहे.
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के (शिवाजी विद्यापीठ)