प्रतिनिधी / बेळगाव
वृत्तपत्र समाजापर्यंत पोहोचविण्यामध्ये विक्रेत्यांची भूमिका महत्त्वाची असते. काही दिवसांचा अपवाद वगळता वर्षभर ऊन-पावसाची तमा न बाळगता भल्या पहाटे उठून वृत्तपत्रे घरोघरी पोहोचवत असतात. त्यांच्या कष्टाची नोंद घेऊन बेळगाव वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे या व्यवसायातील 35 ज्येष्ठ विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला.
संघाचे विद्यमान अध्यक्ष प्रताप भोसले व सचिव विशाल देशपांडे यांच्या हस्ते मानचिन्ह व जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व वृत्तपत्र विव्रेते उपस्थित होते.